एक राज्य, एक RRB मान्यता | संपूर्ण मार्गदर्शन |Chalu Ghadamodi 2025 Marathi Pdf Download
आजच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आणि सामान्य ज्ञानाच्या तयारीत current affairs meaning in marathi म्हणजे चालू घडामोडींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चालू घडामोडी म्हणजे देश-विदेशातील घडणाऱ्या महत्वाच्या घटना, सरकारी योजना, धोरणात्मक बदल, आर्थिक सुधारणा, तसेच सामाजिक-राजकीय घडामोडी यांचा अभ्यास. ह्यामुळे केवळ परीक्षार्थींनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही अद्ययावत माहिती मिळते.
अशाच एका महत्वाच्या सरकारी निर्णयामध्ये “एक राज्य, एक RRB” हे धोरण केंद्रस्थानी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2025 मध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या (RRB) एकत्रीकरणाची चौथी फेरी सुरू झाली आहे. यामध्ये विद्यमान 43 RRBs चे एकत्रीकरण होऊन आता फक्त 28 RRBs अस्तित्वात येणार आहेत. या निर्णयामागचा प्रमुख उद्देश म्हणजे एका राज्यात एकच RRB असणे, ज्यामुळे व्यवस्थापन सुलभ होईल आणि कार्यक्षमता वाढेल.
प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) – एकत्रीकरण धोरण
योजनेचे नाव: “एक राज्य, एक RRB”
घोषणा: केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचना काढली (2025)
एकत्रीकरणाचा उद्देश:
- एका राज्यात एकच RRB असावा
- व्यवस्थापन सुलभ करणे, कार्यक्षमता वाढवणेयावेळचे एकत्रीकरण:
- चौथी फेरी (4th Round)
- विद्यमान 43 RRBs एकत्रित
- नव्याने 28 RRBs अस्तित्वात येणार
एकत्रीकरण होणारी राज्ये (11 राज्ये):
-
- आंध्र प्रदेश
- उत्तर प्रदेश
- पश्चिम बंगाल
- बिहार
- गुजरात
- जम्मू आणि काश्मीर
- कर्नाटक
- मध्य प्रदेश
- महाराष्ट्र
- ओडिशा
- राजस्थान
RRB संबंधित मूलभूत माहिती
स्थापना: 1975
कायदा: प्रादेशिक ग्रामीण बँक अधिनियम, 1976
शिफारस: नरसिंहम समिती (1975)
RRB चे उद्दिष्टे (Objectives):
- ग्रामीण भागाचा आर्थिक विकास
- वित्तीय समावेशन
- प्राधान्य क्षेत्रांना कर्ज पुरवठा
- संस्थात्मक पतपुरवठा मजबूत करणे
RRB चे नियमन आणि देखरेख:
नियामक संस्था: RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया)
पर्यवेक्षण संस्था: नाबार्ड (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक)
मालकी रचना (Ownership Structure):
- घटक हिस्सा (%)
- भारत सरकार 50%
- राज्य सरकार 15%
- प्रायोजक बँक 35%
chalu ghadamodi 2025 marathi pdf download