current affairs meaning in marathi

भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई नियुक्त

भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई नियुक्त |Today’s Current Affairs In Marathi

 नियुक्तीची माहिती:

  • 16 एप्रिल 2025 रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी कायदा मंत्रालयाकडे शिफारस केली की,
    सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई यांना पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात यावे.
  • 14 मे 2025 रोजी न्या. गवई हे देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत.

दलित समुदायातील महत्त्वपूर्ण नियुक्ती:

न्या. के. जी. बालकृष्णन यांच्यानंतर सरन्यायाधीश होणारे दुसरे दलित न्यायमूर्ती ठरणार.

नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य सरन्यायाधीश:

यापूर्वी न्या. मोहम्मद हिदायतुल्ला व न्या. शरद बोबडे हे नागपूर बार असोसिएशनमधून सरन्यायाधीश झाले होते.

महाराष्ट्रातील सरन्यायाधीश – कालावधी:

न्यायमूर्ती कालावधी :

  • न्या. प्रल्हाद गजेंद्रगडकर 1964–1966
  • न्या. यशवंत चंद्रचूड 1978–1985
  • न्या. सॅम भरुचा 2001–2002
  • न्या. एस. एच. कापाडिया 2010–2012
  • न्या. शरद बोबडे 2019–2021
  • न्या. उदय लळित 2022
  • न्या. धनंजय चंद्रचूड 2022–2024

न्या. भूषण गवई यांचा अल्पपरिचय:

जन्म : 24 नोव्हेंबर 1960, अमरावती

परिवार: केरल व बिहारचे माजी राज्यपाल आणि रिपब्लिकन नेते दादासाहेब गवई यांचे सुपुत्र.

कायद्याचा प्रवास:

  • 16 मार्च 1985: बार असोसिएशनमध्ये रुजू.
  • 1987–1990: मुंबई उच्च न्यायालयात वकिली.
  • नागपूर व अमरावती महापालिका व विद्यापीठासाठी स्थायी वकील.

महत्त्वाची कारकीर्द:

  • 1990: नागपूर खंडपीठात वकिली सुरू.
  • 1992–1993: सहायक व अति. सरकारी वकील.
  • 17 जानेवारी 2000: सरकारी वकील म्हणून नियुक्ती.
  • 14 नोव्हेंबर 2003: उच्च न्यायालयाचे अति. न्यायाधीश.
  • 12 नोव्हेंबर 2005: मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती.
  • 24 मे 2019: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती.

अध्यक्ष पदाच्या भूमिका:

मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पनजी खंडपीठांवर अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली.

Today’s Current Affairs In Marathi | Today’s Current Affairs In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top