mpsc current affairs pdf

IRCTC आणि IRFC ला नवरत्न दर्जा मिळाला

खालील माहिती IRCTC आणि IRFC ला नवरत्न दर्जा या विषयावर आधारित आहे. अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे  मुद्दे दिले आहेत|MPSC Current Affairs

IRCTC व IRFC ला नवरत्न दर्जा (3 मार्च 2025):

केंद्र सरकारने 3 मार्च 2025 रोजी IRCTC आणि IRFC या दोन कंपन्यांना नवरत्न दर्जा दिला.

IRCTC – देशातील 25 वी नवरत्न कंपनी

IRFC – देशातील 26 वी नवरत्न कंपनी

भारतीय रेल्वेची नवरत्न कंपन्यांची संख्या : 7 ही सूचीबद्ध CPSEs (Central Public Sector Enterprises) आता नवरत्न आहेत.

नवरत्न दर्जा कोण देतो ? अर्थ मंत्रालयाचा सार्वजनिक उपक्रम विभाग (Department of Public Enterprises) नवरत्न दर्जासाठी निवड करतो.

नवरत्न दर्जाचे फायदे:

  • कंपन्यांना 1000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक सरकारी मंजुरीशिवाय करता येते.
  • अधिक वित्तीय व प्रशासकीय स्वायत्तता प्राप्त होते.

नवरत्न दर्जासाठी विचारात घेतले जाणारे निर्देशक (6 निकष):

  • निव्वळ नफ्याचे निव्वळ मूल्याशी गुणोत्तर
  • मनुष्यबळ खर्चाचे एकूण खर्चाशी गुणोत्तर
  • वापरलेल्या भांडवलावर PBDIT (Depreciation, Interest, Tax पूर्व नफा) गुणोत्तर
  • PBIT (Interest, Tax पूर्व नफा) चे उलाढालीशी गुणोत्तर
  • प्रति शेअर कमाई (EPS)
  • आंतर-क्षेत्रीय कामगिरी

IRFC (Indian Railway Finance Corporation):

स्थापना: डिसेंबर 1986

उद्देश: भारतीय रेल्वेला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातून आर्थिक निधी उभारणे

भूमिका: रेल्वेच्या मोठ्या प्रकल्पांना निधी पुरवठा

IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation):

स्थापना: 27 सप्टेंबर 1999

उद्देश:

  • रेल्वे व स्टेशनवरील खानपान सेवा
  • हॉटेल, टूर पॅकेजेस, जागतिक आरक्षण प्रणाली
  • देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देणे

नवरत्न दर्जा प्राप्त इतर 5 रेल्वे कंपन्या:

  • CONCOR (2014)
  • RVNL (2023)
  • RITES Ltd. (2023)
  • IRCON International Ltd. (2023)
  • RailTel Corporation of India Ltd. (2024)

mpsc current affairs

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top