Reasoning Test Paper | बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 06

Published on: December 24, 2025
noble police bharti book
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

police bharti mock test | police bharti mock test

ही टेस्ट TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

======================

सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MPSCTayari.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

======================

👑 आजची टेस्ट मध्ये 👑

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.

TEST CODE =

1
noble police bharti book

Reasoning Test Paper | बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 06

👑 आजची टेस्ट मध्ये 👑

एकूण प्रश्न - 20

Passing - 10

टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.

1 / 20

परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. या विधानातून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निघू शकेल ?(लिपिक टंकलेखक परीक्षा-2015)

2 / 20

खाली एक विधान दिलेले आहे आणि त्यावर आधारित दोन निष्कर्ष दिलेले आहेत. उत्तरांच्या पर्यायांमधून योग्य निष्कर्ष शोधा.
विधान :
आपल्या आरोग्यासाठी सकाळचे फिरणे (Morning walk) चांगले असते.
निष्कर्ष :
I) सर्व निरोगी लोक सकाळी फिरायला जातात.
II) सायंकाळी फिरणे हानीकारक असते.पर्यायी उत्तरे :

3 / 20

सात सारख्या आकाराच्या सफरचंदांचे 12 मुलांत समान वाटप करायचे आहे. एकाही सफरचंदाचे चारपेक्षा जास्त तुकडे करायचे नाहीत. तर कमीत कमी तुकडे करून समान वाटप करण्याची पद्धत पर्यायांतून निवडा.

4 / 20

शालीन कर्नाटक संगीत गायक आहे. हे एकत्रितपणे सिध्द करणारी दोन विधाने निवडा.
अ) शालीन गानवृंदासाठी गातो.
ब) कर्नाटक संगीत शालीनला सर्वात जास्त आवडते.
क) कर्नाटक किंवा हिंदुस्थानी सारख्या गायला कठीण संगीतासाठी भरपूर तालीम केलेल्या आवाजाची गरज असते.
ड) शालीनचा गानवृंद कर्नाटक संगीत सादर करतो.
इ) शालीनने कर्नाटक संगीताचा अनेक वर्षे सराव केला आहे.
पर्यायी उत्तरे :

5 / 20

शहराने सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. स्टेशनांच्या भोवतीची दाटी उठवायला हवी आणि स्टेशनांच्या परिसरात शेवटपर्यंत पोहोचवणारी वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. दाटी कर लादून वाहनतळ भाडे महाग करणे यातून शहरातील गाड्यांचे व्यसन कमी करायला हवे. डिझेलवर दिली जाणारी आर्थिक कपात कमी करणे किंवा डिझेल वाहनांवरील करात वाढ करणे यांचा उपयोग होऊ शकतो. उच्च प्रदूषणाच्या दिवसांत शासनाने वायू बाहेर टाकणे कमी करण्यासाठी कडक उपाय करायला हवेत.
पुढे दिलेल्या यादीतून प्रदूषण कमी व्हायला सहाय्य करणारा/रे पैलू निवडा :
a) जसा हिवाळा निवळायला लागतो आणि धुक्याची समस्या रहात नाही तसे प्रदूषणाविषयी कोणीही बोलत नाही.
b) सर्वकप स्वच्छ हवा कायद्यान्वये दोषी व्यक्तीला किमान 18 महिन्याची शिक्षेची शिफारस केली आहे परंतु आतापर्यंत एकालाही ती दिली गेलेली नाही.
c) एकामागून एक येणाऱ्या शासनांनी श्रीमंतानाच लाभदायक ठरलेल्या आर्थिक सवलती रद्द करण्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.
d) मुखाच्छादनाचा व हवा शुद्धकांचा वापर करणे.
पर्यायी उत्तरे :

6 / 20

प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे आणि हे छोटे खोके पुन्हा वाहातुक खोक्यांत बांधले आहेत. लॉरीच्या सामान ठेवण्याच्या भागात असे किती खोके मावतील ?
तथ्ये:
1) प्रत्येक वाहतुक खोका घनाकार असून त्याच्या एका बाजूचे माप पन्नास सेंटीमीटर आहे.
2) लॉरीचे सामानाच्या जागेचे क्षेत्रफळ तीस चौरस मीटर आहे.
प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात तथ्य 1 व 2 चे उचित वर्णन करणाऱ्या पर्यायाची निवड करा.

7 / 20

हिंद महासागर हा दक्षिण महासागरपेक्षा मोठा आहे. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी दोन तथ्ये ओळखा.

तथ्ये :
अ) अॅटलांटिक हा आर्क्टिकपेक्षा मोठा आहे.
ब) दक्षिण महासागर हा सर्वात लहान नाही.
क) प्रशांत महासागराचा विचार केला नसता, तर अॅटलांटिक महासागर सर्वात मोठा ठरला असता.
ड) हिंद महासागर तिसरा मोठा आहे.
पर्यायी उत्तरे

8 / 20

पुढील दोन सत्य तथ्ये विचारात घ्या व त्यासंबंधातील योग्य पर्याय निवडा.
अ) पावसाळी मोसमात उष्णकटिबंधातील देशात स्वाइनफ्लुची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ होते.
ब) पावसाळी मोसमात विषाणू संसर्गात प्रचंड प्रमाणात वाढ होते.
पर्यायी उत्तरे :

9 / 20

पुढे पाच विधाने दिली आहेत व त्यापुढे विशिष्ट क्रमाने तीन विधाने असलेले पर्याय दिले आहेत. सुरुवातीच्या दोन विधानांच्या आधारे तिसरे विधान हे यथार्थ निष्कर्ष ठरते असा पर्याय निवडा.
विधाने :
a) वाहतुकीची कोंडी हवेतील कार्बन मोनॉक्साईड वाढवते.
b) वाहतुकीची कोंडी आरोग्याला घातक आहे.
c) वाहतुकीची कोंडी नेहमीच आरोग्याला घातक नसते.
d) वाहतुकीची कोंडी नेहमीच कार्बन मोनॉक्साईडमध्ये भर पडायला कारणीभूत ठरत नाही.
e) कार्बन मोनॉक्साईडमध्ये पडणारी भर आरोग्याला घातक असते.
पर्यायी उत्तरे :

10 / 20

20 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी दोन तथ्ये ओळखा.
तथ्ये :
a) 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले.
b) 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण झाले नाहीत.
c) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 2 : 1 ने जास्त आहे.
d) अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा पूर्ण न करणाऱ्यांपेक्षा 5 : 1 ने जास्त आहे.
पर्यायी उत्तरे :

11 / 20

पुढील परिच्छेदातील शेवटच्या विधानाच्या भूमिकेच्या संदर्भात विसंगत पर्याय निवडा :
कदाचित प्लुटोचा चंद्र, शॉराँ कवच तयार करून व बऱ्याचशा सौरवाऱ्याला पुनर्दिशा देऊन त्या ग्रहाच्या बर्फाळ वातावरणाचा ऱ्हास लक्षणीय प्रमाणात कमी करत असावा. चंद्राच्या आकारामुळे व जवळिकीमुळे प्लुटोचा चंद्राबरोबरचा सहसंबंध ही सूर्यमालेतील एक असामान्य अशी अन्योन्यक्रिया आहे. या चंद्राचा व्यास प्लुटोच्या निम्म्याने थोडा जास्त आहे व तो त्याच्यापासून फक्त 19,310 किमी अंतरावर असलेल्या कक्षेतून भ्रमण करतो.. तुम्हाला माहीत आहेच की आपला चंद्र याच्या तिपटीने पृथ्वीच्या जवळ आहे व तो मंगळाइतका मोठा आहे.

12 / 20

पुढील माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम दिले आहेत. उचित कृतिक्रम दर्शवणारा पर्याय निवडा.
माहिती : कृतिहीनतेमुळे गुंतागुंतीच्या चयापचय बदलांचा ओघ निर्माण होतो. न वापरलेल्या स्नायूंचा अपक्षय होतो, ते सहनशील रहात नाहीत त्यांची चरबीचे ज्वलन घडवण्याची क्षमता संपून ते आखडायला लागतात आणि मोठ्याप्रमाणात ग्लुकोजवर अवलंबून राहू लागतात. कृतिहीन स्नायूच्या पेशींतील मायटोकॉड्रिया म्हणजे चरबीचे ज्वलन करणाऱ्या उर्जा थैल्या नाहीशा होऊ लागतात. हे स्नायू ते जे काही जरासे काम करतात त्यासाठी ते कार्बोहायड्रेटसवर अवलंबून राहू लागतात, परिणामी न जळलेले लिपिड जमा होऊ लागतात व रक्त खूप चरबीयुक्त होते.
कृतिक्रम
अ) लोकांनी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असणारे अन्न खाणे थांबवायला हवे.
ब) लोकांनी रक्तातील चरबीचा साठा कमी व्हावा, यासाठी चरबीयुक्त अन्नघटक खाणे टाळायला हवे.
क) लोकांनी सुदृढ रहाण्यासाठी शरीराच्या सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत.
पर्यायी उत्तरे :

13 / 20

पुढे माहिती घटकांचा संच दिला असून त्यापुढे कार्यवाही सुचवल्या आहेत. त्यासंबंधातील सर्वात उचित पर्याय निवडा.
* शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही नेहमीचीच बाब झाली आहे.
* बदलत्या हवामानामुळे त्यासंबंधीच्या सर्व अटकळी विचित्र होत आहेत, त्यामुळे शेती करणे जिकीरीचे झाले आहे.
* माध्यमे ग्राहकांची बाजू घेऊन वाढत्या किमतींचा बागुलबोवा उभा करण्यात आघाडीवर असतात.
* अचूक निदानावर बेतलेली दूर संवेदक शेती, पोषण शेती, सुरक्षित अन्न निर्माण करणारी शेती, वायरलेस शेती, जलवायू चलाख शेती, बदलता खत वापर शेती, वात आलेखन, उत्पादन आलेखन, जल गुणवत्ता आलेखन शेती, इत्यादी अनेक नवीन कृषि पद्धति व्यवहारात येत आहेत, परंतु यासंबंधी शेतकरी सजग नाहीत.
कृतिक्रम :
अ) नव्या कृषिपद्धतींचा वापर करून सुरक्षित अन्नाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी बुद्धिमान, तंत्रकुशल, कामसू व प्रामाणिक कृषि साहाय्यकांची फळी शासन, स्वयंसेवी संस्था व कृषि विद्यापीठे यांनी सहभागाने सज्ज केली पाहिजे.
ब) शेतकरी, स्वयंसेवी गट व ग्राहक यांनी पुढाकाराने व सहभागाने गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे रास्त किंमत मिळण्याच्या दृष्टीने वितरण केले पाहिजे आणि याबरोबरीने शासनानेहवा, जल, माती यांचे स्रोत, विविध परिस्थितिकी यांची गुणवत्ता टिकवणारी धोरणे आखून त्यांची हानी टाळली पाहिजे.
क) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी, झटणाऱ्या राजकीय पक्षांना शासनाने सढळ हाताने साथ दिली पाहिजे, कारण त्यामुळे ते स्वतःची प्रगती साधू शकतील.

14 / 20

पुढे दिलेल्या पर्यायातून प्रतिपादन (A) व त्याचे कारण (R) यांच्या संदर्भात योग्य निवड करा.
प्रतिपादन (A) : सरकार चालवित असलेल्या शाळातून 6 ते 15 वयोगटातील सर्व विद्यार्थ्याना मोफत प्राथमिक शिक्षण दिले जात असले तरीही अल्पसंख्य पालक आपल्या मुलांना या शाळांत दाखल करण्यासाठी इच्छुक असतात.
कारण (R) : ज्या ठिकाणी सरकारी शाळा आहेत त्याच भागात सरकार दबाव आणणाऱ्या व्यवस्थापनांना खाजगी शाळा सुरू करण्याची परवानगी देते व बहुसंख्य पालकांना वाटते की खाजगी शाळा चांगले शिक्षण देतात व म्हणून ते आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल करतात.
पर्यायी उत्तरे :

15 / 20

पुढे दिलेले प्रतिपादन आणि कारण अभ्यासा :
प्रतिपादन (A) :गेल्या काही दशकात मोठ्या प्रमाणात जागतिक तापमान वृद्धी होत आहे.
कारण (R) :आर्थिक विकासावर दिलेल्या जोरामुळे वातावरणात उत्सर्जित केल्या जाणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण धोकादायक प्रमाणात वाढले आहे.प्रतिपादन आणि कारण यांचे वर्णन करणारा सर्वात उचित पर्याय निवडा.

16 / 20

वाघळांची पूर्वीपासून प्रचलित असलेली भीतिदायक प्राणी अशी प्रतिमा बदलण्यासाठी एका देशातील संवर्धनशील गट प्रयत्नशील आहे. केवळ लाजाळू निशाचर प्राणी असल्यामुळे त्यांची भीती वाटते व त्यांना दोषी ठरवले जाते असे गटाचे म्हणणे आहे.
सत्य असल्यास, पुढे दिलेल्यातील गटाच्या या धारणेच्या अचुकतेवर सर्वात गंभीर शंका घेणारे विधान निवडा.

17 / 20

खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी दोन कारणे RI आणि RII दिलेली आहे. विधानासंदर्भात कारणांचे उपयोजन करून उत्तर शोधा.
विधान : हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी (teleshopping) करतात.
कारणे :
RI - लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात.
RII-हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही.

18 / 20

खालील प्रश्नात । आणि ॥ ह्या दोन घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधांचे स्वरूप ठरवा. । व ।। मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करा.
घटना:
I) श्री हरी आगीत मारले गेले.
II) कंपनीमध्ये आग लागली.
पर्यायी उत्तरे :

19 / 20

खेळाडूंसाठी बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांच्या यादीत पालकात सापडणारे एक्डायस्टेरॉन हे संजीवक समाविष्ट करण्याची शिफारस बर्लिन इंस्टिट्युट ऑफ फार्मसीच्या वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या, 'खेळाडूंच्या प्रदर्शनात वाढ होईल' या भाकिताच्या चाचणीसाठी त्यांनी अभ्यास केला. 'ज्या सहभागींना एक्डायस्टेरॉनची मात्रा दिली त्यांच्या स्नायूंचे वस्तुमान लक्षणीय उच्च प्रमाणात वाढल्याचे, असे त्यांना या अभ्यासात आढळले.
स्वतःच्या लाडक्या ऑलिव्हसाठी दुष्ट लोकांना बडवण्यापूर्वी पोपये पालकचा हवाबंद डबा फोडून उघडत होता तेव्हा त्याचे वागणे नक्कीच सरळ नव्हते. आणि आता हे व्यंगचारित्र्य कदाचित स्वतःचे अतिमानवी सामर्थ्य "उत्तेजकाचा" वापर करून मिळवीत होते असे आता जर्मनीचे वैज्ञानिक म्हणतात.
वरील माहितीच्या आधारे खेळाडूंसाठी एक्डायस्टेरॉनचा वापर करण्यावर बंदी आणण्याची शिफारस करण्याचे सर्वात उचित कारण निवडा.

20 / 20

उपनिषदांत एक अर्थगर्भ नीतिकथा आहे. एकदा विरोचन, असुगंचा अधिपती आणि इंद्र, सुरांचा स्वामी, दोघे मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याला ईश्वराबद्दल विचारले. त्याने या दोघांना आरशात पाहण्यास सांगितले. स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहताना विरोचनाने तत्काळ स्वतःच ईश्वर असल्याचा निष्कर्ष काढला इंद्राने स्व-प्रतिमा निरखत सखोल विचार केला तेव्हा त्याला सर्व भोवताल ईश्वर असल्याचे वास्तव उमगले. काही व्यक्ती स्वतःच्या विकासाचे मोजमाप स्वतः कडून उपभोगल्या जाणाऱ्या रकमेने आणि भौतिक सुविधांनी करतात तर काही व्यक्ती स्वतःची पात्रता स्वतः केलेल्या उत्थान आणि दैवीकरणाच्या सर्व कृतींच्या आधारे करतात. अहंकारी, स्वतः च्या स्वार्थात गुंतलेले, शोषण करताना न डगमगणारे अस्तित्व आणि भोवतालाच्या संदर्भात सर्वोच्च असे सर्जनशील व मनमोकळे अस्तित्व यातला फरक लहानसहान नाही. कथेची मध्यवर्ती कल्पना दर्शवणारा सर्वात उचित पर्याय निवडा.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Trupti Ingale

Tiffany D. Jackson is the critically acclaimed author of Allegedly, Monday’s Not Coming, and Let Me Hear a Rhyme. A Walter Dean Myers Honor Book and Coretta Scott King–John Steptoe New Talent Award winner, she received her bachelor of arts in film from Howard University, earned her master of arts in media studies from the New School, and has over a decade in TV and film experience. The Brooklyn native still resides in the borough she loves. You can visit her at www.mpsctayari.com.

rELATED POST


"अधिक माहिती हवी आहे का? खाली दिलेल्या संबंधित पोस्ट तुमच्यासाठी खास निवडल्या आहेत. या लेखांमध्ये या विषयाशी संबंधित आणखी उपयुक्त माहिती, टिप्स आणि मार्गदर्शन मिळेल. वाचून झालेल्या विषयाला पूरक अशी आणखी सामग्री पाहण्यासाठी पुढे शोधा."

police bharti test

Science Test Paper | सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा – 10

police bharti test | police bharti test ही टेस्ट TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI- ...

noble police bharti book

Math Test Paper | अंकगणित सराव टेस्ट सोडवा – 09

noble police bharti book| noble police bharti book | noble police bharti book ही टेस्ट ...

police bharti syllabus 2022 in marathi pdf download

Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 08

police bharti syllabus 2022 in marathi pdf download | police bharti syllabus 2022 in marathi ...

noble police bharti book

Science Test Paper | सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा – 08

mock test police bharti | mock test police bharti ही टेस्ट TCS व IBPS, MPSC ...

police bharti syllabus 2022 in marathi pdf download

Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 07

police bharti syllabus pdf in marathi | police bharti syllabus pdf in marathi ही टेस्ट ...

noble police bharti book

Math Test Paper | अंकगणित सराव टेस्ट सोडवा – 04

police bharti question paper online test | police bharti question paper online test ही टेस्ट ...

Leave a Comment

Home
Recruitments
Current Affairs
New Post